जालना: कन्हैयानगर येथे तरुणाची आत्महत्या; पाच दिवसांपासून घरातच पडलेला मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला
Jalna, Jalna | Mar 9, 2026 जालना शहरातील कन्हैयानगर परिसरात एका 40 वर्षीय तरुणाने राहत्या घरात साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. 9 मार्च 2026 दु. सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे,घरातील इतर सदस्य लग्नकार्याला गेल्यामुळे पाच दिवसांपासून मृतदेह घरातच पडून राहिल्याने तो कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. मृत व्यक्तीचे नाव राजू प्रकाश चव्हाण असे असून तो कन्हैयानगर परिसरात राहत होता.मिळालेल्या माहितीनुसार,चव्हाण हा विवाहित होता; मात्र पत्नीसोबत राहत नव्हती