माण: माण तालुक्यात गांजाची 40 किलो वजनाची झाडे जप्त, एकाला अटक, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
Man, Satara | Oct 10, 2025 मसवड पोलीस स्टेशन हद्दीतील, वरकुटे, तालुका माण गावच्या हद्दीत, तुपेवाडी येथे गांजा झाडाची लागवड करून, त्याची जोपासना करीत असल्याने एका आरोपीला ताब्यात घेऊन, त्याच्याकडून एकूण 10 लाख 11 हजार 950 रुपये किमतीचा, 40 किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला आहे, सदर कारवाई स्थानिक गुन्हे शाखा सातारच्या वतीने करण्यात आली, स्थानिक गुन्हे शाखेला खास बातमीदार मार्फत ही माहिती मिळाली होती.