नरखेड: जलालखेडा येथे गावाकऱ्यांनी काढलेल्या जन आक्रोश मोर्चाला आले यश
Narkhed, Nagpur | Sep 16, 2025 जलालखेडा येथे गावकऱ्यांच्या वतीने जन आक्रोश मोर्चा 16 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता काढण्यात आला. विविध मागण्यासाठी गावकऱ्यांनी हा मोर्चा काढला होता. लक्ष्मी माता मंदिर बाजार चौक जलालखेडा येथून या मोर्चाला सुरवात करण्यात आली होती. या मोर्च्यात गावकऱ्यांच्या वतीने ग्राम पंचायत व महावितरण कंपनी विरोधात घोषणा दिल्या. सर्व गावकरी हजारोच्या संखेने या मोर्च्यात सहभागी झाले. सर्व गावकरी ग्राम पंचायत व महावितरण कंपनी विरुद्ध घोषणा देत ग्राम पंचायत येथे पोहचले. A