जळगाव शहरातील शासकीय इंजिनिअरिंग कॉलेजसमोरील धुळे-जळगाव सर्विस रोडवर एका दुचाकीधारकाने ६२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाच्या स्कुटीला धडक देऊन त्यांना गंभीर जखमी केल्याची घटना गुरूवारी २० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ८.३० वाजता घडली. याप्रकरणी शुक्रवारी २१ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात अज्ञात दुचाकीधारकारवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.