राहुरी: विखे-कर्डिले एकत्र येऊ नये म्हणून काही कार्यकर्ते लावालाव्या करत होते,अक्षय तु सावध रहा:मा.खा.डाॅ.सुजय विखे पाटील
विखे-कर्डिले एकत्र येऊ नये म्हणून काही कार्यकर्ते आमच्यात लावालाव्या करत होते,परंतु स्वर्गीय शिवाजीराव कर्डिले आणि मला हे सर्व ज्ञात होते. मात्र आता अक्षय तुला मोठे व्हायचे असेल तर गाडीत बसणाऱ्या कार्यकर्त्यांपासून सावध राहा,असं म्हणत माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले आहे. आज बुधवारी सायंकाळी राहुरी शहरातील पांडुरंग मंगल कार्यालयामध्ये आदरांजली सभेत माजी खासदार सुजय विखे बोलत होते.