बुलढाणा: मतदार यादीतील घोळ असताना निवडणूक जाहीर म्हणजे निवडणूक आयोगाचे भाजपशी साटेलोटे - उबाठा शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके
मतदार यादीतील घोळ, दुबार नावे, निवडणुकीतील बोगसगिरी आणि अन्य त्रुटी सपशेल बाजूला सारत राज्य निवडणूक आयोगाने आज स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला. विरोधकांचा आवाज दडपून, त्यांच्या सर्व मागण्या धुडकावून निवडणूक आयोगाने जाहीर केलेला हा कार्यक्रम म्हणजे भाजपाशी असलेलं साटंलोटं आयोगानं पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलंय असे मत उबाठा शिवसेना प्रवक्त्या जयश्रीताई शेळके यांनी व्यक्त केले आहे .