नांदुरा: शहरातील खुदावंतपूर येथील 62 वर्षीय इसमाची गळफास लावून आत्महत्या
नांदुरा शहरातील खुदावंतपूर येथील 62 वर्षीय इसमाने राहत्या घरात लोखंडी अँगल ला दोरीच्या साह्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री ७:३० वाजताच्या दरम्यान उघडकीस आली. प्रल्हाद भास्कर कंडारकर वय ६२ वर्ष राहणार खुदावंतपुर असे मृत इसमाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी एम एस सय्यद, राहुल ससाने तसेच ओम साई फाउंडेशनचे स्वयंसेवक विलास निंबोळकर, प्रवीण दवंगे, अश्विन फेरण, कृष्णा वसोकार हे रुग्णवाहिकासह घटनास्थळी दाखल झाले.