देवणी: धनेगाव येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करण्यासाठी आमदार रोहित पवार स्वतः मोटारसायकल चालवत पोहोचले
Deoni, Latur | Oct 2, 2025 धनेगाव (ता. देवणी, जि. लातूर) इथं मांजरा नदीकाठच्या शेतकऱ्यांची शेती पूर्णपणे बेचिराख झाली. शेतात पाणी साठल्याने काढणीला आलेलं पीक असं डोळ्यासमोर सडून गेलं, अनेकांची शेती वाहून गेली. या नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांना धीर दिला आणि तातडीने पंचनामे करण्याबाबत प्रशासनाशी संपर्क साधला. यावेळी स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.