कळमनूरी: नागेश पाटील आष्टीकर तर लय चिल्लर आहेत -ओबीसी नेते प्रा.लक्ष्मण हाके
कळमनुरी शहरात आज दि. 17 सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती दिनी ओबीसी नेते प्रा .लक्ष्मण हाके ,नवनाथ वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत ओबीसी एल्गार मोर्चा च्या आयोजन करण्यात आले होते .यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी अजित पवार हिंगोली चे खासदार यांच्यावर कडाडून टीका केली आहे .यावेळी हैदराबाद गॅझेटिअर चा जीआर रद्द करा, जे खोटे ओबीसी दाखले देण्यात आले ते तात्काळ रद्द करा या मागणी संदर्भात मान्यवरांच्या हस्ते कळमनुरीचे तहसीलदार यांच्यामार्फत राज्य शासनाला निवेदन देण्यात आले आहे .