धुळे जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांनी नगरपरिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर २१ डिसेंबरच्या मतमोजणी दिवशी पिंपळनेर, शिरपूर-वरवाडे व शिंदखेडा येथे मद्यविक्री बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. संबंधित शहरांच्या हद्दीपासून ५०० मीटरपर्यंतची सर्व दारू दुकाने मतमोजणी संपेपर्यंत बंद राहणार आहेत. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.