नांदुरा: जीवाची पर्वा नकरता रुग्णसेवा देणाऱ्या डॉ.चंदनगोळेचा आमदार संचेती यांनी केला सत्कार
दिनांक 16 सप्टेंबर रोजी सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे ज्ञानगंगा नदीला मोठ्या प्रमाणात पूर आल्याने अवधा बुद्रुक या गावाचा संपर्क तुटला होता अशा परिस्थितीत गावात जाणाऱ्या पुलावरून पाणी वाहत असताना सुद्धा स्वतःचा जीव धोक्यात टाकून डॉ.चंदनगोळे व आरोग्य टीम गावात पोहोचून येथील रुग्णांना आरोग्य सेवा दिली.यावेळी त्यांचा पाण्यातून जाताना चा व्हिडिओ माध्यमावर चांगलाच व्हायरल झाला होता.