शिरूर: रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई 28 किलो गांजा जप्त- पोलीस निरीक्षक वाघमोडे
Shirur, Pune | Sep 27, 2025 रांजणगाव MIDC पोलीस ठाण्याच्या अंमली पदार्थविरोधी मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. पोलीसांनी मौजे बाभुळसर खुर्द येथील सृष्टी सोसायटीतील रो-हाऊसवर छापा टाकून तब्बल 28 किलो वजनाचा, सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला.या कारवाईत दिव्या अतुल गिरे (27, रा. सृष्टी सोसायटी, बाभुळसर खुर्द) व सुरज दिलीप शिंदे (28, रा. देवदैठण, श्रीगोंदा) यांना अटक करण्यात आली आहे.