उदगीर: रामघाट तांडा येथे टँकरने पाणीपुरवठा,पाणी घेण्यासाठी नागरिकांची झुंबड गर्दी
Udgir, Latur | May 12, 2025 उदगीर तालुक्यात ठीक ठिकाणी नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे, प्रशासनाने उदगीर तालुक्यातील टंचाईग्रस्त वाडी तांडे गावांमध्ये टॅंकरने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना संबंधित ग्रामपंचायतीना दिल्या असून,ग्रामपंचायतीने वाडी तांड्यात टॅंकरने पाणीपुरवठा सुरू केला आहे, उदगीर तालुक्यातील रामघाट तांडा येथे नागरिकांना भिषण पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे,१२ मे रोजी राम घाट तांडा येथे पाण्याचा टँकर दाखल होताच गावातील नागरिकांनी झुंबड गर्दी केल्याचे दिसून आले.