नंदुरबार: समाजकल्याण विभागाच्या विविध विषयांवर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात समाज कल्याण विभागाच्या विविध विषयांवर जिल्हास्तरीय आढावा बैठक घेण्यात आली. ही बैठक मा. जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. जिल्हा दक्षता नियंत्रण समिती सभा बैठकीत अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत जिल्ह्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांचा आढावा घेण्यात आला.