उदगीर: धोंडी हिप्परगा येथे आगीच्या भडक्यात चार चाकी व दुचाकी वाहने जळून खाक
Udgir, Latur | Oct 23, 2025 उदगीर तालुक्यातील धोंडीहिप्परगा येथील हनुमान मंदिर चौकात थांबविण्यात आलेल्या चारचाकी व दुचाकी वाहनांना अचानकपणे लागलेल्या आगीत चारचाकी वाहने व लुणासह अन्य एक दुचाकी जळाली. नागरिकांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळावरुन एक छोटा हत्ती व व दोन दुचाकी हटविले. ही घटना गुरुवारी २३ ऑक्टोबर रोजी पहाटे दोनच्या सुमारास घडली. आग कशामुळे लागली याचे कारण मात्र समजू शकले नाही आगीमुळे जवळपास पाच लाखांचे नुकसान झाले आहे, काही वाहने नागरिकांनी प्रसंगावधान राखून हटविण्यात अली,हनुमान मंदिर चौकात घडली घटना