सातारा नगरपालिका अतिक्रमण विभागाने, राजवाडा येथील गोलबागे जवळील, रस्त्यावर बसणाऱ्या व्यवसायांना आज उठवून, चौपाटी येथील राजवाडा समोर विक्री करण्यासाठी बसले आहे, मात्र या ठिकाणी व्यवसाय होत नसल्याचे सांगत, हंगामी व्यवसायिकांना तात्पुरत्या स्वरूपात राजवाडा येथील गोल बागेजवळ रस्त्यावर बसण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी विक्रेत्यांनी केली आहे, या ठिकाणी व्यवसाय होत नसल्यामुळे विक्रेत्यांचे नुकसान होत असल्याचे त्यांनी सांगितले.