पाथर्डी: पाथर्डीत ढगफुटी सदृश्य परिस्थिती. जनावरे, वाहने चक्क रोडही गेला वाहून...
अहिल्या नगर जिल्ह्यातील पाथर्डीत सोमवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या ढगफुटी सदृश्य परिस्थितीने तालुक्यात अक्षरशः हाहाकार माजवला आहे.अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. जनावरे आणि वाहने पाण्याच्या प्रवाहात वाहून गेलेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. रात्री तीनच्या सुमारास जोरदार पाऊस कोसळला असून करंजी आणि मढी यांसारख्या गावांमध्ये लोकांना घर सोडून झाडांवर आणि उंच ठिकाणी आश्रया घ्यावे लागल्याचे चित्र समोर आले आहे.