प्रोड्युस वॉरंटमधील आरोपीस वैद्यकीय तपासणीसाठी सेलू सरकारी रुग्णालयात आणण्यात आले होते. मात्र वैद्यकीय तपासणी नंतर पोलीस स्टेशनला जाण्यासाठी शासकीय वाहनात बसत असताना सदर आरोपीने पोलिसांच्या हाताला झटका मारून हातकडीसह पळून गेल्याची घटना बुधवार 10 डिसेंबर रोजी रात्री 9 12 वाजता घडली. या प्रकरणी पोलीस कर्मचारी सुरेश कुऱ्हे यांच्या फिर्यादीवरून सेलू पोलीसात गुरुवार 11 डिसेंबर रोजी 2 26 वाजता गुन्हा दाखल.