नेवासा: शनिशिंगणापुर देवस्थानातील कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा
शनिशिंगणापूर येथील ५७० कर्मचाऱ्यांना गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने संबंधित ५७० कर्मचाऱ्यांनी थकीत वेतनासाठी ५ नोव्हेंबर पासून साखळी उपोषण करणार असल्याचे निवेदन श्री शनेश्वर देवस्थान विश्वस्त समितीचे सदस्य सचिव नायब तहसीलदार राजेंद्र वाकचौरे यांना दिले आहे.