लोकशाही प्रक्रियेत सुशिक्षित मतदारांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने 26 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजताच्या सुमारास आयोजित भंडारा पदवीधर मतदार नोंदणी अभियान बैठकीत बोलताना आमदार डॉ. परिणय फुके यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना "घराघरात जा आणि पदवीधरांना नोंदवा" असा विजयाचा मंत्र दिला. या बैठकीला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला असून, मार्गदर्शन करताना डॉ. फुके यांनी आगामी काळात महाविद्यालयीन युवक-युवतींशी संपर्क साधणे तसेच ऑनलाइन व ऑफलाइन माध्यमांचा प्रभावी वापर करण्यावर भर दिला.