अमळनेर: जुन्या वादातून तरूणाला लाकडी फळीने मारहाण; मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
अमळनेर तालुक्यातील सबगव्हाण येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून एका तरूणाला लाकडी फळीने मारहाण करून गंभीर दुखापत केल्याची घटना सोमवारी २२ डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजता घडली आहे. याप्रकरणी गुरूवारी २५ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता मारवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.