बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक हृदय पिळवटून टाकणारी आणि संतापजनक घटना समोर आली आहे. रुई येथील रहिवासी व पुण्यातील खाजगी कंपनीत काम करणारा राहुल चव्हाण या व्यक्तीने आपल्या दोन जुळ्या मुलींचा गळा कापून खून केल्याची धक्कादायक घटना २१ आक्टोबर रोजी घडली आहे. राहुल चव्हाण हा आपल्या पत्नी आणि दोन मुलींसह प्रवास करत होता. प्रवासादरम्यान पती-पत्नीमध्ये किरकोळ वाद झाला.