श्री साई नाट्य कला मंडळ तुमसरच्या वतीने तुमसर येथे झाडीपट्टी मराठी रंगभूमी वडसाच्या वतीने जपलं कुंकू सवतीचं नाट्यप्रयोगाचे आयोजन दिनांक दिनांक 29 डिसेंबर रोजी करण्यात आले. या झाडीपट्टी मराठी नाटकाचे विधीवत उद्घाटन अर्थ बांधकाम सभापती डॉ. लक्ष्मण भगत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गिरधारी बघेले यांच्या हस्ते आमदार राजकुमार बडोले यांच्या अध्यक्षतेखाली रात्री 11 वाजता संपन्न झाले. कार्यक्रमाचे उपाध्यक्षपदी माजी सभापती मनोज बोपचे, आदी मान्यवर नागरिक उपस्थित होते.