शिरपूर: तालुक्यातील महा-ई-सेवा व आधार सेवा केंद्रसंचालकांचे ३ दिवसीय कामबंद आंदोलन, तहसीलदारांना दिले निवेदन
Shirpur, Dhule | Nov 11, 2025 तालुक्यातील सर्व महा-ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र संचालकांनी शासनाच्या अन्यायकारक व सापत्नभावाच्या वागणुकीविरोधात शिरपूर तहसीलदारांना 11 नोव्हेंबर 2025 रोजी विविध मागण्यांचे निवेदन देत राज्यस्तरीय तीन दिवसीय कामबंद आंदोलनात सहभागी होत असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.सदर निवेदन निवासी नायब तहसीलदार पंकज मगर यांनी तहसील कार्यालयात स्वीकारले. यावेळी तालुक्यातील महा-ई-सेवा व आधार केंद्राचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.