शहरातील इसरका मार्केट परिसरातील एक जीर्ण इमारत कोसळल्याने त्या खाली दबून पाच सहा दुचाकी वाहनांचे नुकसान झाले. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही. ही घटना बुधवारी (दि.२३) दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.प्राप्त माहितीनुसार, शहरातील दुर्गा चौक इसरका मार्केट परिसरात महेश पटेल यांच्या मालकीची एक इमारत आहे. दोन वर्षापूर्वी पटेल यांनी इमारतीची बबू मोर यांना विक्री केली. मोर यांनी ही इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन