हिंगणघाट: मोहगांव येथील शेतकऱ्याने ५ एकरातील उभ्या सोयाबीन पिकात चक्क सोडले जनावरे:दिड लाख रुपयांचे नुकसान
हिंगणघाट: यंदा अतिवृष्टी व सोयाबीन पिकावर आलेल्या विविध रोगामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पिक निर्सगाने हिरावून नेले आहे.मोहगांव येथील शेतकऱ्याने सोयाबीनचे पिक येणारच नाही या भितीने ५ एकरातील सोयबीन पिकात चक्क स्वताच्या डोळ्यासमोर चरायला जनावरे सोडले आहे. मोहगांव येथील शेतकरी पुरुषोत्तम औरके यांनी ५ एकरमध्ये सोयबीनची पेरणी केली सोयबीनला चांगले रासायनिक खते दिले, पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी त्यांनी सुरुवातीपासूनच महागड्या किटकनाशकांची फवारणी सुध्दा केली.