रामटेक: पेंच व्याघ्र अभयारण्यातील चोरबाहुली सह सिल्लारी, खुर्सापार पर्यटन द्वार पर्यटकांसाठी आजपासून खुले
Ramtek, Nagpur | Oct 12, 2025 रामटेक तालुक्यातील पेंच व्याघ्र अभयारण्यातील चोरबाहुली, सिल्लारी व खुर्सापार पर्यटन द्वार रविवार दिनांक 12 ऑक्टोबरला सकाळी सहा वाजता पासून वन्यजीव पर्यटकांसाठी खुले करण्यात आले आहे. मागील वर्षी या वन्यपरिक्षेत्रात नैसर्गिक सौंदर्यसह वाघ, बिबट सह विविध वन्य प्राणी, जीव, जंतु, पक्षी मोठ्या संख्येने दिसले होते. मानसिंग अभयारण्य अंतर्गत चोरबाहुली पर्यटन द्वार रविवारी आयोजित एका शुभारंभ कार्यक्रमांतर्गत मोठ्या उत्साहाने खुला करण्यात आला. यावेळी आरएफओ जयेश तायडे प्रामुख्याने उपस्थित होते.