मुलचेरा: विकासपल्ली, रेगडी आणि घोट परिसरात अवकाळी वादळ व गारपीटमुळे मक्का पिकांचे मोठे नुकसान, माजी खासदार नेते यांनी दिली भेट
चामोर्शी तालुक्यातील मौजा-विकासपल्ली, रेगडी आणि घोट परिसरात अचानक आलेल्या अवकाळी वादळ वाऱ्याने आणि गारपीट पावसाने मक्का पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले. या आपत्तीमुळे शेतकरी हतबल झाले असून, तातडीने पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी मा.खा. तथा भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री डॉ. अशोकजी नेते यांनी केली आहे.