सेलू: सेलू येथील मार्केटयार्डमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक आमसभा उत्साहात संपन्न
Seloo, Wardha | Sep 26, 2025 सिंदी कृषि उत्पन्न बाजार समितीची वार्षिक आमसभा ता. २६ शुक्रवारला दुपारी १२.३० वाजता सेलू येथील उपबाजारपेठेच्या मार्केटयार्डमध्ये मोठ्या उत्साहात पार पडली. आमसभेचे अध्यक्षस्थान सभापती केशरीचंद खंगारे यांनी भूषविले. या वेळी उपसभापती प्रमोद आदमने, सचिव महेंद्र भांडारकर आणि माजी सभापती विद्याधर वानखेडे, माजी उपसभापती काशिनाथ लोणकर, तसेच आजी, माजी संचालक मंचकावर उपस्थित होते.