आज मंगळवार 4 नोव्हेंबर रोजी वाळुज एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिली की, तीन नोव्हेंबरला रात्री नऊ वाजता एका फिर्यादीने वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की, तीन नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता त्यांची अल्पवयीन मुलगी ही घराच्या बाहेर गेली पुन्हा घरी परत आली नाही त्यांच्या अल्पवयीन मुलीला कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात करण्यासाठी अपहरण करून नेले आहे, याप्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक गीते हे पुढील तपास करीत आहे.