आमगाव: आमगावातील सराईत गुन्हेगार सहा महिन्यांसाठी हद्दपार,पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांच्या निर्देशान्वय कारवाई
Amgaon, Gondia | Sep 18, 2025 पोलीस अधीक्षक कार्यालय गोंदिया यांच्या निर्देशान्वये आमगाव पोलीसांनी आणखी एका सराईत गुन्हेगाराविरोधात हद्दपारीची कारवाई केली आहे. आमगाव पोलीस ठाण्यात शरीराविरुद्ध गुन्हे व जबरी चोरीसह चार गुन्हे दाखल असलेला मुस्ताक इसमाईल शेख (वय ३०, रा. सरकारटोला, ता. आमगाव) यास उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, देवरी यांच्या आदेशान्वये सहा महिन्यांसाठी हद्दीतून बाहेर काढण्यात आले आहे. देवरी, आमगाव व सालेकसा तालुक्याच्या हद्दीतून त्याला हद्दपार करण्य