जालना शहरातील एका विवाहीतेने तालुका पोलीस ठाण्यात पती केदार लक्ष्मणराव मातने आणि त्यांच्या सासर्यांविरुद्ध गंभीर आरोप नोंदवत फिर्याद दिली आहे. गुरुवार दि. 6 नोव्हेंबर 2025 रोजी रात्री 11.30 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विवाहीतेला लग्नानंतर पती व सासर्यांनी सतत मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली होती. विवाहानंतर तीला सुरुवातीला काही काळ चांगली वागणूक दिली. मात्र नंतर पती व सासर्यांकडून विनाकारण त्रास, शिवीगाळ आणि द्वेषाची वागणूक सुरू झाली, असे फिर्यादीत म्हटलंय.