अलिबाग: लोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पवार शरद नामदेव यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी प्रचार सभा
Alibag, Raigad | Nov 26, 2025 लोहा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५ च्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दिनांक २६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी १ च्या सुमारास लोहा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पवार शरद नामदेव यांच्यासह नगरसेवक पदाच्या उमेदवारांसाठी आयोजित प्रचार सभेला खासदार सुनील तटकरे यांनी संबोधित केले. ‘चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्राचा विकास करणे’ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजेंडा असून लोहा नगरपरिषदेची ही निवडणूक शहराच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे. वाढत्या शहरीकरणाचा विचार करता येथील पायाभूत सुविधांचा विकास करणे आवश्यक आहे. शहरातील रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य व्यवस्था यासह लोहा-कंधार येथील पर्यटन वाढीच्या दृष्टीकोनातून विकासाला गती देणे हे राष्ट्रवादीचे प्रमुख उदिष्ट असल्याचे स्पष्ट केले.