विक्रमगड: वसई येथे आश्रमाच्या गेटला धडकून आत घुसली कार
वसई येथे एक कार स्कूटर आणि आश्रमाच्या दोन गेटला धडकून आश्रमात घुसल्यानेअपघात घडला आहे. उमेळा परिसरात असलेल्या साधू आश्रमाजवळून कार जात असताना कार चालकाला फिट आली आणि कार रस्त्यावरील एका स्कूटरला धडकली, त्यानंतर आश्रमाच्या दोन गेटला धडकून आत घुसली त्याठिकाणी असलेल्या झाडाला धडकली. या अपघातात त्या ठिकाणी कचरा टाकत असलेले एक साधू एक जखमी झाला आहे. सुदैवाने अपघातात जीवितहानी झालेले नाही.