शिरपूर: शिरपूर बस स्थानकावरून सुरत येथील 65 वर्षीय वृद्ध पुरुष बेपत्ता,शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद
Shirpur, Dhule | Nov 11, 2025 दोंडाईचा येथे बँकेचे काम आटोपून शिरपूर येथे मुलीकडे मुक्कामास आलेले सुरत येथील 65 वर्षीय वृद्ध बेपत्ता झाल्याप्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात मिसिंग नोंद करण्यात आली.राजेंद्र शामसिंग सिसोदिया वय 65 रा.घनश्याम सोसायटी सुरत असे बेपत्ता झालेल्या वृद्धाचे नाव आहे.सदर वृद्ध हा 7 नोव्हेंबर रोजी सकाळी साडे 10 वाजेच्या सुमारास सुरत जाण्यासाठी शिरपूर बस स्थानकावर होते.दरम्यान ते बेपत्ता झाले.पुढील तपास पोहेकॉ चेतन सोनवणे करीत आहे..