धुळे: धुळ्याचे सुपुत्र राम सुतार यांचे निधन; कलाविश्वाचा 'भीष्माचार्य' हरपला : मंत्री जयकुमार रावल
Dhule, Dhule | Dec 18, 2025 धुळे जिल्ह्याचे सुपुत्र आणि जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांचे वयाच्या १०१ व्या वर्षी निधन झाले आहे. ‘स्टॅच्यू ऑफ युनिटी’सह अनेक भव्य शिल्पांचे ते शिल्पकार होते. त्यांच्या निधनाने कला क्षेत्रातील भीष्माचार्य हरपल्याची भावना पालकमंत्री जयकुमार रावल यांनी व्यक्त केली आहे. भगवान बुद्ध व स्वामी विवेकानंदांच्या पुतळ्यांमुळे त्यांनी धुळ्याचे नाव जगात उज्ज्वल केले.