कुरखेडा: कूरखेडा येथे वनविभागाचा वतीने नाचत गात वृक्ष दिंडी काढत वन्यजीव सप्ताहाचा केला समारोप
कूरखेडा - वनविभागाचा वतीने दि.१ ते ७ आक्टोबंर पर्यंत वन्यजीव सप्ताह साजरा करण्यात आला यावेळी ७ दिवसात विविध उपक्रम राबवत नागरीकाना वन व वन्यजीव यांचा संरक्षणा करीत जनजागृति करीत आवाहन करण्यात आले तर आज दि.७ आक्टोबंर मंगळवार रोजी दूपारी १२ वाजता शहरातून वृक्ष दिंडी काढत सप्ताहाचा समारोप करण्यात आला यावेळी वनपरिक्षेत्र कार्यालय येथून वाजत व नाचत गात वृक्ष दिंडीची सूरवात करण्यात आली वन व वन्यजीव संरक्षणाचा संदेश या माध्यमाने नागरीकाना देण्यात आला.