अंजनगाव–परतवाडा मार्गावरील शासकीय विश्रामगृहाजवळ आज सायंकाळी सुमारे ९:३० वाजताच्या सुमारास अकोटकडून येणाऱ्या एक भरधाव आयशर ट्रकने वॅग्नर वाहनाला जबर धडक दिली. या भीषण अपघातात वॅग्नर कारचा चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ जवळील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.गावंडगाव येथील रहिवासी व व्यवसायाने डॉक्टर असलेले देशमुख (वाहन क्रमांक एम एच ०४जी झेड २६८०) ने कडू हॉस्पिटलजवळील कॉर्नरवरून वाहन वळवत असताना केळीचे कॅरेट घेऊन येणाऱ्या आयशर ट्रक ने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली.