गोंदिया शहरातील द्वारका लाॅन च्या पुढे दिनांक 12 नोव्हेंबर च्या रात्री अकरा वाजेच्या सुमारास चारचाकी वाहनाचा अपघात झाला. सदर चारचाकी वाहन डिव्हायडरला आढळल्याने यावेळी मोठा अपघात घडला. सुदैवाने चारचाकी वाहनात बसलेल्या प्रवासांना इजा झाली नाही. लगेच परिसरातील नागरिकांच्या माध्यमाने चार चाकी वाहनात बसलेल्या प्रवासांना बाहेर काढण्यात आले. द्वारका लॉन च्या पुढे असलेल्या डिव्हायडरवर कोणत्याही प्रकारचे संकेत स्टिकर दिसून न आल्याने हा अपघात झाल्याचे बोलले जाते.