गोंडपिंपरी: पुन्हा घेतला वाघाने एका महिलेचा बडी, गणेश पिपरी येथील घटना, गोंडपीपरी तालुक्यात आठ दिवसात वाघाने घेतला दोघांचा बडी
गोंडपिपरी तालुक्यात वन्यजीव हल्ल्यांची मालिका सुरूच असून, येथील गणेशपिपरी गावात वाघाने पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एका महिलेचा बळी घेतला आहे. आज रविवारी दि.२६ ऑक्टोबर, सायंकाळच्या सुमारास ही हृदयद्रावक घटना घडली. यामुळे तालुक्यात प्रचंड दहशत आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.