सावली: विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी - विधिमंडळ पक्षनेते आ. विजय वडेट्टीवार
सावली येथे सामान्य ज्ञान स्पर्धेचे बक्षीस व स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकांचे वितरण समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी उच्चशिक्षित होणे काळाची गरज असून शिक्षणाच्या बळावरच समाजाची व आपल्या कुटुंबाची प्रगती साधता येते. माझ्या मतदार संघातील प्रत्येक विद्यार्थ्याने प्रशासकीय सेवेत यशाचे शिखर गाठावे या हेतूनेच मी पुढाकार घेऊन सामान्य ज्ञान स्पर्धेचे, तसेच स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन करणारी पुस्तके वितरण करीत आहे. आपण या संधीचे सोने करीत भविष्यात उच्चशिक्षित होऊन समाजाच्या प्रगतीची कास धरावी