सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५०व्या जयंती निमित्त वैजापूर येथे काढण्यात आलेल्या "राष्ट्रीय एकात्मता दौड"मध्ये वैजापूर शहरातील सर्व थरातील नागरिकांनी उस्फुर्त प्रतिसाद देऊन राष्ट्रीय एकात्मता,बंधुता,व अखंडतेचे दर्शन घडवून सरदार वल्लभभाई पटेल यांना अभिवादन केले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून ही एकात्मता दौड आरंभ झाली.डॉ. दिनेश परदेशी, दशरथ बनकर, संदीप ठोंबरे,जेष्ठ नागरिक धोंडीरामसिंह राजपूत यांनी यांनी ध्वज दाखवला.