वर्धा: वर्धा पोलिसांचे 'सायबर कवच': गुन्ह्यांपासून बचावासाठी विशेष जनजागृती मोहीम
Wardha, Wardha | Oct 14, 2025 सध्या संपूर्ण देशात 'सायबर जनजागृती सप्ताह' (ऑक्टोबर २०२५) सुरू आहे आणि या निमित्ताने वर्धा जिल्हा पोलिस अधीक्षक, अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यामध्ये एक महत्त्वाकांक्षी 'सायबर साक्षरता अभियान' राबवत आहेत. असे आज 14 ऑक्टोबर रोजी रात्री दहा वाजता दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात कळविले आहेजिल्हा पोलिसांचे सायबर शाखा, शहर तसेच ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालये, कंपन्या आणि सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना सायबर गुन्ह्यांविषयी जागरूक करत आहेत.