चंद्रपूर: अभियंता दिनी' अभियंत्यांची दारूपार्टी... चंद्रपूर येथील शासकीय कामकाज सोडून विश्रामगृहात रिचवले पेग
अभियंता दिनी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी शासकीय कामकाज सोडून थेट जिल्हा परिषदेचे शासकीय विश्रामगृह वसंत भवन गाठले. अभियंत्यांनी तेथे दारू पार्टीचे आयोजन केले होते. आम आदमी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तेथे छापा टाकला आणि अभियंत्यांचा हा कारनामा उघडकीस आणला. या घटनेचा व्हिडिओ आम आदमी पक्षाने सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.