धुळे तालुक्यातील निमगुळ गावात कार्तिकी एकादशीचे औचित्य साधून 'खोपडी एकादशी' आणि तुळशी विवाह सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. निमगुळ येथे पारंपरिक पद्धतीने भगवान विष्णू आणि तुळशीचा विवाह लावण्यात आला. यावेळी तुळशी वृंदावन आकर्षक पद्धतीने सजवून, ऊस, झेंडूची फुले आणि आवळे वाहून पूजन करण्यात आले. ज्या घरात तुळस असते, ते घर स्वर्गासमान असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.