परभणी जिल्ह्यासाठी ऐतिहासिक ठरणारा सीआयआयआयटी प्रकल्प लवकरच येण्याच्या मार्गावर असून, हा उपक्रम पालकमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुरावा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनामुळे मंजूर झाला आहे. या सुमारे ११५ कोटी रुपयांच्या प्रकल्पातून दरवर्षी सुमारे ३,००० विद्यार्थ्यांना इंडस्ट्री ४.० युगाशी सुसंगत अत्याधुनिक तांत्रिक व उद्योगाभिमुख प्रशिक्षण मिळणार असून परभणीला कौशल्य विकासाच्या नकाशावर ठळक स्थान मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. सीआयआय