मोहाडी तालुक्यातील करडी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या निलज खुर्द येथील वैनगंगा नदीपात्रात अवैध रेती उपसा करणाऱ्या वाळू माफियांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दि. १९ जानेवारी रोज सोमवारला रात्री ११ वा.च्या सुमारास पोलीस शिपाई निखील रंजित कोचे हे पथकासह गस्तीवर असताना, नदीपात्रातून रेतीची चोरी करून वाहतूक करणारा ट्रॅक्टर (क्र. MH 35 AR 3941) मिळून आला. या कारवाईत ट्रॅक्टर, ट्रॉली आणि एक ब्रास रेती असा एकूण ८ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.