सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये एचपीव्ही (HPV) लसीमुळे मुलींच्या जीवाला धोका असून या लसीमुळे वंध्यत्व येते किंवा त्यांना गर्भधारणा होत नाही, असा दावा केला आहे.
<nis:link nis:type=tag nis:id=FactCheck nis:value=FactCheck nis:enabled=true nis:link/>
हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आहे. उपलब्ध वैज्ञानिक संशोधन आणि डब्ल्यूएचओ (World Health Organization) सारख्या आरोग्य संस्थांच्या अहवालांनुसार तसेच, आरोग्य तज्ज्ञांच्या मते ही लस सुरक्षित असून ती महिलांना गर्भाशयाच्या कर्करोगापासून संरक्षण देण्यासाठी प्रभावी उपाय मानली जाते. यासंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या १०४ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा.