हिंगणघाट: पिंपळगांव (मा) येथे उत्साहपूर्ण वातावरणात आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते समाज भवनाचे लोकार्पण
हिंगणघाट तालुक्यातील पिंपळगांव (मा)येथे आमदार समिरभाऊ कुणावार यांच्या हस्ते भव्य आणि उत्साहपूर्ण वातावरणात समाजाच्या दीर्घकालीन गरजा पूर्ण करणाऱ्या समाज भवनाचा लोकार्पण सोहळा पार पडला.या भवनाच्या निर्माणासाठी आमदार कुणावार यांनी त्यांच्या विशेष निधी अंतर्गत ३० लक्ष रुपये इतका निधी उपलब्ध करून दिली आहे. यावेळी आमदार समिरभाऊ कुणावार म्हणाले की. समाज भवन ही केवळ एक इमारत नसून गावकऱ्यांसाठी विविध उपक्रमांचे केंद्रस्थान ठरणार आहे. असे मत त्यांनी व्यक्त केले.