बुलढाणा: शेलगाव देशमुख येथे अखंड चातुर्मास सांगता सोहळा निमित्त ह.भ.प ज्ञानेश्वरी काळबांडे यांचे हरिकिर्तन
बुलढाणा जिल्ह्यातील शेलगाव देशमुख येथील मारोती संस्थान येथे अध्यक्ष माधवराव डोळस यांच्या मार्गदर्शनाखाली २९ आक्टोबर पासून अखंड चातुर्मास सांगता सोहळ्यास सुरवात करण्यात आली आहे.४ नोव्हेंबर रोजी रात्री ८ वाजता काशिनाथ श्रीराम भातखोडे यांच्या सौजन्याने ह.भ.प. ज्ञानेश्वरी काळबांडे वाशीम यांचे हरिकीर्तन संपन्न झाले.